Skip to content
-

सत्याचा आवाज,जनतेचा विश्वास !

सत्याचा आवाज,जनतेचा विश्वास !

  • Home
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • Login
Subscribe
Close

Search

क्राईम

शिर्डीत ५ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण; मारहाण करून व्हिडिओ व्हायरल, खंडणीची मागणी

By Marathi Awaaj
June 13, 2026 1 Min Read
0

जाफराबाद येथील ५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला शिर्डी येथे डांबून ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जाफराबाद पोलिसांचं तत्पर कारवाईमुळे चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सउद महम्मद चाउस (वय ५५, रा. किल्लाभाग, जाफ्राबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनिस शेख वजीर (वय ३०, रा. सारवाडी, जि. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलगा अबुझर कौसर बिंदीयाब (वय ५, रा. किल्लाभाग, जाफ्राबाद) असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, ११ जून २०२६ रोजी पहाटे शिर्डी येथील मनमाड रोडवरील साई योगेश गेस्ट हाऊस परिसरात आरोपीने मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून त्याला मारहाण केली व त्याचा व्हिडिओ तयार करून व्हॉट्सॲपवर प्रसारित केला. तसेच मुलाला आणखी मारहाण करण्याची धमकी देत १,५०० रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. संबंधित रक्कम फोनपेच्या माध्यमातून स्वीकारल्यानंतर मुलाचा पत्ता सांगण्यासाठी पुन्हा १,५०० रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी तातडीने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा शोध घेत पोलिसांनी शिर्डी परिसरातून चिमुकल्याची सुटका केली. त्यानंतर मुलाला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या प्रकरणी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, पॉक्सो अधिनियम २०१२, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्ह्याचे घटनास्थळ व आरोपी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Author

Marathi Awaaj

मराठी आवाज NEWS हे महाराष्ट्रातील आणि देश-विदेशातील घडामोडी जनतेपर्यंत वेगवान, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवणारे 24×7 डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. राजकारण, गुन्हे, शेती, शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रश्न, सरकारी निर्णय, ब्रेकिंग न्यूज आणि जनतेशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर आमचे विशेष लक्ष असते. 🎯 आमचे ध्येय : "सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास!" ✅ वेगवान आणि अचूक बातम्या ✅ निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता ✅ महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी ✅ ग्राउंड रिपोर्ट आणि विशेष बातम्या ✅ जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य 📢 विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी 'मराठी आवाज NEWS' सोबत कायम जुळून रहा. 🔔 चॅनलला Subscribe करा, Bell Icon दाबा आणि प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत राहा. 📱 मराठी आवाज NEWS – सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास!

Follow Me
Other Articles
Previous

Hello world!

Next

जालन्यात भर दिवसा ३८ वर्षीय शेख रफीक शेख कासिम यांची निघृण हत्या..!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • WhatsApp
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • Telegram
        Copyright 2026 — {marathiawaaj. All rights reserved. Blogsy WordPress Theme